yuva MAharashtra UPI बाबत मोठा निर्णय घेणार? Google Pay आणि PhonePe कंपन्यांचं टेन्शन वाढलं !

UPI बाबत मोठा निर्णय घेणार? Google Pay आणि PhonePe कंपन्यांचं टेन्शन वाढलं !





सांगली समाचार  दि. ०९|०२|२०२४

देशात सध्या सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करताना दिसत आहे. लोकांनी यूपीआय पेमेंट करण्यावर जास्त भर दिला आहे. यासाठी भारतीय ॲप्सचा वापर करावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. भारतीय ॲप्सचा वापर करुन लोकांना पेमेंट करावे यासाठी मेक इन इंडिया या संकल्पनेवर जास्त भर दिला जाणार 

आरबीआयने काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट ॲपवर कारवाई केली आहे. त्यामुळे देशातील यूपीआय पेमेंटचा वापर बंद करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. परंतु देशातील यूपीआय पेमेंट बंद होणार नसल्याचे आता सांगण्यात आले आहे. यूपीआय पेमेंटसाठी अनेक अॅपचा वापर केला जातो.

पेटीएम पेमेंट्सच्या कारवाईनंतर गुगल पे आणि फोन पे वरील युजर्स वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे १५ ते २० टक्के टक्के फायदा होणार असल्याचे सांगण्या येत आहे. देशात यूपीआय पेमेंट्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. युपीआय पेमेंटसाठी सरकार भारतीय ॲप्सवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे Make In India वर भर पडेल.

देशात फोन पे या ॲपचे सर्वाधिक युजर्स आहेत. BHIM ॲपचा वापर सर्वात कमी होत आहे. त्यामुळेच भीम ॲप जास्त लोकांनी वापरावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. जेणेकरुन लोकांना भीप पे ॲपचा वापर वाढवला पाहिजे.