सांगली समाचार - दि. १६|०२|२०२४
नवी दिल्ली - हवामानाची अचूक माहिती देता यावी या साठी तयार करण्यात आलेला अत्याधुनिक हवामान उपग्रह INSAT-3DS हा उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. शनिवारी (दि १७) फेब्रुवारीला संध्याकाळी ५.३० वाजता हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. जीएसएलव्ही एफ १४ या शक्तिशाली रॉकेटचा वापर या साठी केला जाणार आहे. इनसेंट-3 मालिकेतील उपग्रहांमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारचे जियोस्टेशनरी उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यातील हा सहावा उपगर असून पुढील महिन्यात पुढील महिन्यात सातवा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
इनसेंट ३ डीएसचे वैशिष्ट्य
या उपग्रहाद्वारे जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल यंत्रणेची माहिती देणे सोपे होणार आहे. सध्याच्या इन्सेंट मालिकेतील उपग्रहांची शक्ति आणि क्षमता वाढण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपग्रहांच्या साह्याने बचाव आणि मदत कार्य देखील राबवणे सोपे होणार आहे. या उपग्रहांमध्ये 3A, 3D आणि 3D प्राइम ही आधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. या द्वारे भारतातील हवामान बदलांची अचूक आणि वेळेवर माहिती देता येणार आहे. या उपग्रहाचे वजन हे २ हजार २७५ किलो आहे. या उपग्रहांच्या निर्मितीमध्ये भारतीय उद्योगांचे मोलाचे योगदान आहे. लिफ्ट ऑफ द्रव्यमान हे रॉकेटचे प्रारंभिक द्रव्यमान आहे.
या उपग्रहाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण सामान्य नागरिकांना पाहता यावे यासाठी इस्रोने लॉन्च व्ह्यू गॅलरी (LVG), SDSC-SHAR श्रीहरिकोटा येथून थेट पाहण्याची सोय केली आहे. या साठी इस्रोच्या संकेत स्थळावर माहिती देण्यात आली आहे. तसेच इस्रोच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर देखील हे प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.