Sangli Samachar

The Janshakti News

दहावी बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार शिक्षण संस्था महामंडळाचा घेतला मागे; पालकांनी सोडला विश्वास !




सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४

सांगली - २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावी बारावी परीक्षेवरील बहिष्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्थगित केल्याने पालकांनी विश्वास सोडला. आपल्या विविध मागण्यांसाठी महामंडळाने या परीक्षेवर बहिष्कार घातलेला होता. याबाबत राज्य शासनाला नोटीसही दिलेली होती. परंतु शासनाने त्यानंतर कोणतेच पाऊस उचललेले नव्हते. त्यामुळे परीक्षेबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते, पालकात अस्वस्थता जाणवत होते.

मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे शिष्ट मंडळ शिक्षण व अर्थ खात्यातील अधिकारी यांची संयुक्तिक बैठक शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी घेतली. महामंडळाच्या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन लवकरच सोडवण्यात येतील, असे आश्वासन या बैठकीत दिल्याने, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महामंडळाने हा बहिष्कार मागे घेतला.



महामंडळाच्या कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले की आमच्या विविध मागण्या होत्या, महामंडळाचे सहकार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली असून, शासनास व शिक्षण व महामंडळाला आमचे संपूर्ण सहकार्य असून आता परीक्षा नियोजित वेळेत सुरू होतील.

याबाबत बोलताना रावसाहेब म्हणाले की, २०२४ पूर्वीचे वेतनेतर अनुदान दिले जाईल, महामंडळ शिष्टमंडळाबरोबर शिक्षण खात्याची दर तिमाही बैठक आयोजित केली जाईल, शिक्षकेतर भरतीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येतील, असे आश्वासन दिल्याने महामंडळाने यांनी बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महामंडळाने बहिष्कार मागे घेतल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.