सांगली समाचार दि. ०९|०२|२०२४
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यानंतर नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव निवडणूक आयोगाने दिले. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह वटवृक्ष असावे असे मागणी केली होती परंतु परीक्षा देणे या मागणीला विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे नाव आणि चिन्ह सुचवण्यात सांगितले होते यानुसार शरद पवार गटाने काही पर्याय दिले होते यापैकी एक नाव शरद पवार यांच्या पक्षाला देण्यात आले आहे. तर पक्षाच्या चिन्हाबाबत अजून निर्णया झालेला नाही राज्यसभा निवडणुकीला पक्षाचे लागणार नसल्याने शरद पवार काट्याने त्याचे प्रस्ताव दिलेले नसले तरी पवार हे वटवृक्ष चिन्ह मिळावे यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे याला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे वटप्राक्ष ही चिन्ह विश्व हिंदू परिषद संघटनेचे अधिकृत चिन्ह आहे आणि ते नोंदणीकृत असल्याचे म्हटले आहे यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादींना हे चिन्ह देण्यास विहीपणे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे शरद पवारांनी उगवता सूर्य आणि काचेचा ग्लास अशा चिन्हांचाही प्रस्ताव दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिनीने दिलेले आहे जर ही चिन्हे मागितली असतील तर वटवृक्षाचा पर्याय उपलब्ध नसल्यास या दोन चिन्हांपैकी एक दिले जाण्याची शक्यता आहे विहिंपदेखील निवडणुका लढवत असते. प्रवीण तोवरिया यांनी याच संघटनेतर्फे अनेकदा निवडणूक लढवली आहे. यामुळे विहिंपने हे चिन्ह पवारांना देण्यात आक्षेप घेतला आहे. पुढील निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले आहे