yuva MAharashtra आता टार्गेटवर कोण ? देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो वरून रंगली चर्चा !

आता टार्गेटवर कोण ? देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो वरून रंगली चर्चा !

सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

पुणे - येथील 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४'चे आयोजनाचे उद्घाटन करताना तेथील एक शस्त्रास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतले होते. यावरून सध्या भाजपात सुरू असलेल्या इन्कमिंगवरून नेटक-यांनी निशाणा साधला आहे. "आता टार्गेट कोण ?" असा सवाल नेटक-यांनी केलेला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे येथे संरक्षण सामग्री निर्मितीची चांगली परिसंस्था निर्माण झाली आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी आहे. अनेक संरक्षण विषयक संस्था राज्यात आहेत. तीस टक्के दारुगोळा महाराष्ट्रात तयार होतो. सन २०१७ साली एअरोस्पेस, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यामुळे महाराष्ट्राचा देशात मान वाढला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४'चे आयोजन शनिवार (दि.२४) ते सोमवार (दि. २६) दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून पिंपरी चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (मोशी) येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४) झाले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बिपीन शर्मा, लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंग, एयर मार्शल विभास पांडे, 'निबे लिमिटेड'चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप तसेच संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  यावेळी त्यानी फेन्स एमएसएमई क्षेत्रातील मॅक्स एरोस्पेस, निबे लिमिटेड या कंपन्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारशी निर्मितीसंदर्भात करार केले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ताकद ओळखली. स्वतःची संरक्षण सामग्री स्वतः देशात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा देश मजबूत देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भारताला आता तंत्रज्ञान दिले जाऊ लागले आहे. लाखो कोटींची बचत होऊन रोजगार निर्मिती झाली आहे. एमएसएमई क्षेत्रानेही चांगले काम करून दाखवले. सप्लाय चेनवर भर देऊन चार डिफेन्स क्लस्टर तयार केले जाणार आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि रोजगार निर्मिती होणार आहे."