yuva MAharashtra भाजपा-शिंदे गटात मिठाचा खडा

भाजपा-शिंदे गटात मिठाचा खडा




सांगली समाचार दि. ०७| ०२ | २९२४

कल्याण: उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री (2 फेब्रुवारी) भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.

हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला. या प्रकरणानंतर, महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं म्हटलं जात आहे. भाजपाने आता या संदर्भात कल्याणमध्ये एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीत आमदार गणपत गायकवाडांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समोर येत आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडून (शिंदे गट) महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ शहरात बॅनर लावले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांची कल्याणमध्ये बैठक पार पडली आहे. आमदार गणपत गायकवाड यांना पाठिंबा देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. पक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या बॅनरवर शिंदेंसह शिवसेना नेत्यांचे फोटो न लावण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. यामुळे आता भाजपा- शिवसेना यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

युती असली तरी …

राज्यात जरी भाजपा- शिवसेना युती असली तरीही कल्याण मतदार संघात भाजपा विरुद्ध शिवसेना असंच वातावरण आहे. भाजपा नेते, पदाधिकारी यांना शिवसेनेकडून सहकार्य मिळत नव्हते. त्यांना आडकाठी केली जात होती, अशी खदखद भाजपा नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे.

फडणवीस-शिंदेंच्या भूमिकेवर लक्ष

दरम्यान कल्याणपुरता असलेला ही वादाची ठिणगी कल्याणपुरतीच मर्यादित राहते की निदान वणवा होऊन तो राज्यभर पसरतो हे पहावे लागेल.