सांगली समाचार -दि. १७|०२|२०२४
चिपळूण : एक ना एक दिवस भारतात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. संसदेलाही तसा निर्णय घ्यावा लागेल, असे मत साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांनी व्यक्त केले. पुणे येथील राजेशिर्के प्रतिष्ठान या संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिनी सावर्डे येथील भागीरथीबाई राजेशिर्के सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, एमपीएससीचे माजी चेअरमन किशोरराजे निंबाळकर, सातारा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, राजेशिर्के प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष राजेशिर्के, शिरकाई प्रतिष्ठानचे दत्ताजी राजेशिर्के, मार्केटयार्डचे सभापती विक्रम पवार, शिरकाई प्रतिष्ठानचे सुनील राजेशिर्के, रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, राजेशिर्के प्रतिष्ठान पुणेचे माजी अध्यक्ष शिवसिंह राजेशिर्के, जिल्हा परिषद माजी सदस्य निकिता सुर्वे आदी उपस्थित होते. उद्या एखाद्याला आरक्षण दिले की, दुसरा रूसणार आणि तिसरा आंदोलन करणार. त्यामुळे आरक्षणाचा तिढा तेढ निर्माण करणारा आहे. देशाच्या एकसंघतेला धोकादायक आहे, असेही शिवेंद्रसिंह राजेंद्र यांनी म्हटलं आहे.