सांगली समाचार | बुधवार दि. ०७ |०२|२०२४
तासगाव - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) युवा नेते रोहित आर. पाटील यांनी कर्तव्य संवाद यात्रा सुरू केली आहे.
अंजनी येथील स्व. आर. आर आबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन ही कर्तव्य संवाद यात्रा सुरू केली आहे.
या कर्तव्य संवाद यात्रेच्या माध्यमातून तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील प्रश्न जाणून घेणार आहेत. तसेच या यात्रेतून गेल्या पाच वर्षांत आ. सुमनताई पाटील यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा ते जनतेसमोर मांडणार आहेत.