yuva MAharashtra हिजाब विरोधात मुस्लिम युवतीचे प्राणांतिक उपोषण

हिजाब विरोधात मुस्लिम युवतीचे प्राणांतिक उपोषण




सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

जयपूर - जयपूरच्या सांगानेर विधानसभा क्षेत्रात मानसरोवर स्थित वीर तेजाजी रोड मैदानावर २० वर्षांची तंजीम मेरानी नावाची मुस्लिम युवती हिजाबच्या विरोधात प्राणांतिक उपोषणाला बसली आहे.

मेरानी सोबत तिचे वडील आमिर मेरानी हे देखील निषेधाच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या मुलीला तिच्या मागण्यांबाबत पूर्ण पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आता शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबाबतच्या गणवेशातील सवलतीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

हिजाबबाबत राजधानी जयपूरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राजस्थान सरकारचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांना पुढे यावे लागले. तसेच शाळांमध्ये फक्त स्कूल ड्रेसकोड लागू केला जाईल, असे सांगावे लागले.

जो कोणी याचे पालन करत नाही तो स्वतःसाठी दुसरी शाळा शोधू शकतो, असेही दिलावर म्हणाले. तंजीमला विविध संघटनांकडून एसिड हल्ल्याची धमकीही दिली जात आहे, त्यामुळे सरकारने तिला सुरक्षा पुरवली आहे. २० वर्षांच्या तनजीमचे म्हणणे आहे की, या धरणे उपोषणादरम्यान मला काही झाले तर माझी शेवटची इच्छा आहे की सरकारने माझ्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मला अहमदाबादमध्येच दफन करावे.

शाळा शिक्षणासाठी बनवल्या जातात. राजकारणासाठी नाही, त्यामुळे शाळांमध्ये एकसमान ड्रेस कोड लागू करावा. ज्यांना हिजाब घालायचा आहे त्यांनी शाळेच्या आवाराबाहेर हिजाब घालावा, त्यात आमची काही अडचण नाही, मात्र शाळांमध्ये समान शिक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे तिचे म्हणणे आहे.