सांगली समाचार - दि. २०|०२|२०२४
कवठे महांकाळ - रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली आहे. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. तर प्रशांत चिले असे गंभीर जखमीचे नाव आहे.
अपघातानंतर येथे बराच काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला केले तर मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटलला पाठवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.