सांगली समाचार दि. ०८|०२|२०२४
मुंबई - ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नारायण राणे दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतांना ठाकरे म्हणाले होते की,"मला कळत नव्हतं का माझे आमदार फुटत आहेत. मला माहित होतं. मी माझे नासके आंबे फेकून दिले. मला या मिंद्याला दाढी ओढून आणता आलं नसतं का?
या आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवून मुख्यमंत्रिपद वाचवालं असतं. पण मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडून दिलं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली
यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले, ”या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं जगाला माहीत आहे. घरी बसणार्यांना तर आधीच घरी बसवलं आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, बाळासाहेब भूमिका घेतल्यावर ते बदलत नव्हते मात्र हे सतत भूमिका बदलत असतात. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करतो. सतत आमच्या कृतीवर टीका होते. मनातील जळफळात का आहे. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आम्ही मुख्यमंत्री झालो तर सहन होत नाही का? असा सवाल एकनाथ शिंदेनी ठाकरेंना केला.