सांगली समाचार - दि. २२|०२|२०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी यांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले देखील दिले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेतेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा या दोघांमध्ये झाल्याचं समजतं आहे.
दरम्यान या बैठकीत महायुतीत जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला आहे. लोकसभेच्या महायुतीत एकूण ४८ जागा आहे. या जागेच वाटप कस होणार असाअसं प्रश्न नेहमीच चर्चेत आला आहे. अशात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने या बैठकीला उपस्थिती दर्शवली नव्हती. त्यामुळे बैठकीत काय घडलं हे सांगता येणं काहीसं कठीण आहे. दरम्यान या बैठकीत भाजप नेते आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते मात्र अजित पवार यांच्या सह त्यांच्या गटातील नेते उपस्थित नसल्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भातील तिढा सुटणार का? याची राजकीय चर्चा सुरु आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागा आम्हाला दिल्या जाव्यात, अशी एकनाथ शिंदे यांच्या गटाची मागणी आहे. दुसरीकडे, सध्या सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेसुद्धा महाराष्ट्रात सहा ठिकाणी उमेदवार उभे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली 22 जागांची मागणी आणि अजित पवार गटाची सहा जागांची मागणी लक्षात घेता 28 जागा याच ठिकाणी संपून जातात. म्हणजेच भाजपाच्या वाट्याला फक्त 20 जागा येऊ शकतात.