yuva MAharashtra युट्युब चॅनेल सबस्क्राईब करायला सांगत तब्बल ३५ लाखांची फसवणूक

युट्युब चॅनेल सबस्क्राईब करायला सांगत तब्बल ३५ लाखांची फसवणूक

सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

पुणे - यू ट्यूबवर चॅनल सबस्क्राईब करायला सांगून एका ४२ वर्षीय नागरिकाची ३५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वाकड-पुणे येथे घडली आहे.या प्रकरणी योगेश माधवराव सोनार (वय ४२, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शांभवी सोनी, टेलिग्राम खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला. यावेळी कोणतीही गुंतवणूक न करता केवळ व्हॉट्सॲपद्वारे यू ट्यूब सबस्क्राईब करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. फिर्यादी यांना सुरुवातीला फायदा होत असल्याचे भासवून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी वेगवगेळ्या बँक खात्यावर असे एकूण ३५ लाख ३५ हजार ३६४ रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.