yuva MAharashtra ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर सांगलीकरांच्था घशाला कोरड !

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर सांगलीकरांच्था घशाला कोरड !


सांगली समाचार  - दि. २०|०२|२०२४

सांगली - सांगली महापालिकेच्या माळ बंगला येथील 56 एम.एल.डी. जलशुद्धीकरण केंद्रातील वाळू फिल्टर बेडची वाळू बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे सांगली शहरासह उपनगरांमधील पाणीपुरवठय़ावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर सांगलीकरांच्या घशाला कोरड पडणार आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, अजून किमान सहा दिवस काम सुरू राहणार असल्याने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

शहराला काही दिवसांपासून अशुद्ध आणि अळीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मदन भाऊ युवा मंचासह सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी माळ बंगला केंद्राची पाहणी केली होती. नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने फिल्टर बेडची वाळू बदलण्यासह नादुरुस्त व्हॉल्व दुरुस्त करणे, त्याचबरोबर अद्ययावत क्लोरीनेटर बसवण्याच्या सूचना त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱयांना दिल्या होत्या. त्यानुसार फिल्टर बेडची वाळू बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.