सांगली समाचार - दि. २६|०२|२०२४
मुंबई - मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट घेतली. या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडवणीस म्हणाले, 'उद्यापासून राज्याचे अधिवेशन सुरु होत आहे. आता मंत्रिमंडळ बैठक झाली. अनेक निर्णय घेण्यात आले. आज विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पाहिली नाही. पण त्यांचं एक पत्र आले आहे. सध्या नेमक्या कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे'.
'शेतकरी, अवकाळी, प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण आहे. विकासकाम होत आहेत. गुंतवणूक राज्यात येत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी १० टक्केचा कायदा केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी जो शब्द दिला होता, तो पूर्ण झाला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
'विरोधी पक्ष निराशेतून जात आहेत. रोज नवे विकास कामे होत आहेत. धानाला जो बोनस जाहीर केला होता, त्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या संदर्भात सांगतील, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'सागर बंगला सरकारी आहे. त्यामुळे सागर बंगल्यावर सरकारी कामासाठी कोणाचीही अडवणूक होणार नाही. ते कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती हवी आहे? मला माहीत नाही, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. धादांत खोटे आहेत. मराठा समाजासाठी सारथी सारख्या योजना सुरु केली. मराठा आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं'.
'तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षण टिकवू शकले नाहीत. जी स्क्रिप्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते, ती स्क्रिप्ट मनोज जरांगे यांनी का मांडावी? कायदा व सुव्यवस्था सांभाळून कोणीही आंदोलन केलं तरी हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आंदोलन केलं तर पोलिसांना योग्य कारवाई करावी लागेल, असेही ते म्हणाले.