सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४
सांगली - हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुराणात माघ महिना हा मोक्षाचा महिना मानला गेला आहे. याचमुळे या महिन्यात येणाऱ्या माघ गणेश जयंतीला विशेष महत्व दिले जाते. याचे औचित्य साधून गणेश भक्तांनी महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या गणेश दर्शनासाठी विविध गणेश मंदिरात गर्दी केली होती.
सांगली शहर पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये त्याचप्रमाणे सांगली शहरातील विविध भागात व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते