yuva MAharashtra भाजपातील घरचे उपाशी उपरे तुपाशी

भाजपातील घरचे उपाशी उपरे तुपाशी

 

सांगली समाचार - दि. १७|०२|२०२४

मुंबई - भाजपामध्ये ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू आहे, आणि त्यांना त्याचे बक्षीसही मिळत आहे. त्यावर भाजपातील जुने जाणते नेते व कार्यकर्त्यांनी खाजगीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. परंतु पक्षनिष्ठेमुळे ते जाहीररित्या काहीच बोलत नाहीत. या खदखदीला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीच तोंड फोडले आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या सर्व्हेमुळे मतदारांचा कल लक्षात आल्याने महायुतीच्या तोंडचे पाणी पळाले. आता आपली सत्तेच्या खुर्चीकडे जाणारा मार्ग भक्कम करण्यासाठी मुळच्या निष्ठावंतांना ताकद देण्याऐवजी, अन्य पक्षातील वजनदार नेत्यांना पक्षात घेऊन हा मार्ग भक्कम करण्याचे प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांनी सुरू ठेवला आहे.

आयुष्यभर ज्यांच्यासाठी लोकांच्या शिव्या खाल्ल्या, प्रसंगी अंगावर लाट्याही झेलल्या. त्यांच्या मांडेला मांडी लावून बसण्याची वेळ या निष्ठावंतावर आलेले आहे. परंतु पक्षनिष्ठेचे बाळकडू प्यायलेले हे नेते व कार्यकर्ते काहीच बोलू शकत नाहीत.

वापरा व फेकून द्या' ही भाजपाची कूटनीती असल्याने, भाजपमध्ये गेलेल्यांची गरज संपली की बाजूला फेकले जातात. हा इतिहास माहिती असूनही सत्तेची खूप निष्ठेपेक्षा मोठी ठरत आहे. परंतु जनताही भाजपच्या या कूटनितीला जाणून आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचे आयाराम जिंकतात की पक्षावर नेष्ठा ठेवून निवडणूक रिंगणात असलेले अन्य पक्षाचे उमेदवार लोकसभेत व विधानसभेत पोहोचतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारण "पैसा बोलता है" ही निवडणुकीची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. आता नवमतदार या परंपरेला छेद देत, कुणाच्या बाजूने राहतो हे पाहणी औस्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी आयाराम वरचढ ठरत असल्याचे चित्र, त्यांचे चरित्र बदलवण्यास कारणीभूत ठरत आहे. आणि हाच सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला आहे.