सांगली समाचार - दि. १७०३|२०२४
नवी दिल्ली - देशभरात आता लोकसभा निवडणुकीचा आखाडा मारण्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुक तोंडावर असताना भाजपने विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे घेत डॅमेज करायला सुरूवात केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनामुळे भाजपकडे आता मोठा मुद्दा आहे. या निवडणुकीअगोदर राज्यसभेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. भाजप या जागांवर भक्कम उमेदवार देत आहे, जेणेकरून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल. अशातच भाजपने गुजरातमधील राज्यसभेच्या जागेसाठी सुरतमधील बड्या व्यापाऱ्याला उमेदवारी दिली आहे.
डायमंट सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरत शहरामधील हिरे उद्योगपती गोविंद भाई ढोलकिया यांना उमेदवारी दिली आहे. गोविंद भाई ढोलकिया यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रूपयांची देणगी दिली होती. गोविंदभाई ढोलकिया 74 वर्षांचे असून ते सहावी शिकलेले आहेत. राजकारणात किंवा राज्यसभेवर जाईल असं मला कधीट वाटलं नव्हतं, असं गोविंदभाई ढोलकिया म्हणाले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोविंदभाई ढोलकिया यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. राम मंदिराला भरभक्कम देणा-या ढोलकी यांची तिजोरीचं कुलूप आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी उघडणार हे उघड गुपित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.