सांगली समाचार - दि. २६|०२|२०२४
पुणे - पुणे शहराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक दर्जा होता... होता म्हणण्याचे कारण असे, गेल्या काही महिन्यात पुण्याची ही ओळख पुसण्याचे पाप काही नीच मंडळी करीत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, नवी पिढी त्यात अडकत चालली आहे.
माझ्या एका मित्राने नुकताच एक व्हिडिओ पाठवला. (कदाचित आपण हा व्हिडिओ पाहिलाही असेल) आणि मन चिंताग्रस्त झालं... पुण्यातील एक व्यक्ती येथील एका टेकडीवर नियमित व्यायामाच्या निमित्ताने जात असतो. त्यानेच शेअर केलेला हा व्हिडिओ, आपल्या भागातील त्या प्रत्येक पालकांनी पाहायला हवा, ज्यांची मुले-मुली शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. आपल्या भागातील संस्कृती, संस्कार याचा विचार करता, आपली मुले-मुली या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत. हा विश्वास डळमळीत व्हायला कारणीभूत हा व्हिडिओ ठरतो आहे.
https://youtu.be/FdqsD-QDZFU?si=sY_xGbAaSnQ8FhWJ
"घे की रे... एकदा घेतल्यानं काही होत नाही !"
उत्सुकतेपोटी... किंवा कुणी आग्रह केल्याने या मोहजालात गुरफटलेली व्यक्ती यातून बाहेर पडणे महाकठीण असते. म्हणूनच नंतर पश्चाताप नि काळजी करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी... नाही का ?...
तेव्हा मित्रांनो विचार करा...
नुकताच पुण्यामध्ये ट्रग्जचा कोट्यावधी रुपयांचा साठा सापडला. पुण्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नोकरीच्या निमित्ताने आलेली अशी बरेच मुले मुली या ट्रॅपमध्ये सापडत आहेत... आपण जागरूक व्हायला हवे ना ?...
ही बातमी आपल्या संपर्कातील त्या प्रत्येक पालकांपर्यंत पाठवा, ज्यांची मुले-मुली कोणत्या ना कोणत्या कारणाने पुण्यात वास्तव्यास आहेत...