yuva MAharashtra सांगलीच्या संवादिनीचा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अभिनव उपक्रम

सांगलीच्या संवादिनीचा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अभिनव उपक्रम

 





सांगली समाचार  - दि. १४|०२|२०२४

सांगली - व्हॅलेंटाईन डे... अवघ्या तरुणाईचा हा आवडता दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीला विविध प्रकारच्या भेटी देऊन तरुण-तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. परंतु सांगलीतील वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संवादिनी वाचन प्रेमी महिलांनी हा दिवस आगळावेगळा पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं आहे.


सांगली क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणार सदानंद कदम हे उत्तुंग व्यक्तिमत्व इतिहास अभ्यासक व लेखक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्याचप्रमाणे संवादाचे महत्त्व जपणारी संस्था म्हणून संवादिनी आणि पुस्तकांना घर देणार वाचन प्रेमी वाचनालय अशी संवादिनीची आगळीवेळी ओळख...

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने संवादिनी ग्रुपच्या वतीने सुप्रसिद्ध लेखिका वर्षा चौगुले या सदानंद कदम यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. सांगली येथील महावीर उद्यान (बापट मळा) येथे दुपारी साडेतीन वाजता हा आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे चा कार्यक्रम रंगणार आहे. सांगली शहर व परिसरातील वाचन प्रेमी नागरिकांनी याफाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन संवादिनी ग्रुपच्या संचालका सौ. अर्चना मुळे यांनी केले आहे.