सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४
आपल्यापैकी कित्येक जणांसाठी चहा म्हणजे जीव की प्राण असतो. अशाच चहाप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोज तीन कप चहा प्यायल्याने वय वाढण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो, असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. लॅन्सेट या प्रतिष्ठित विज्ञान विषयक नियतकालिकात याबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
चीनमधील सिचुआन विद्यापीठाने याबाबतचं संशोधन केलं. त्यांनी 37 ते 73 वर्षे वयातील सुमारे 5,998 ब्रिटिश नागरिक आणि 30 ते 79 वर्षे वयोगटातील 7,931 चिनी नागरिकांचे सर्वेक्षण करुन हा निष्कर्ष काढला. या व्यक्तींपैकी जे नियमित चहा पीत होते, त्यांचं वय वाढण्याची प्रक्रिया चहा न पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी वेगाने झाल्याची माहिती संशोधनात मिळाली. या संशोधनात सहभागी व्यक्तींना ब्लॅक टी, ग्रीन टी, येलो टी किंवा चीनमधील पारंपारिक उलाँग टी प्यायण्यास सांगण्यात आलं. ते दररोज किती चहा पितात याची नोंद ठेवण्यात आली. या व्यक्तींचं बॉडी फॅट, कोलेस्ट्रॉल, ब्लडप्रेशर अशा गोष्टींच्या आकडेवारीतून त्यांचं बायोलॉजिकल वय मोजण्यात आलं.
तीन कप चहा
"दररोज तीन कप चहा, किंवा 6 ते 8 ग्रॅम चहाची पानं पिणाऱ्यांना अँटी-एजिंग बेनिफिट्स दिसून आले", असं या रिसर्चच्या निष्कर्षात लिहिलं आहे. "सतत चहा पिणाऱ्यांच्या तुलनेत मध्यम प्रमाणात चहा पिणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक अँटी-एजिंग बेनिफिट्स दिसले आहेत", असंही यामध्ये म्हटलं आहे. (Three cups of tea benefits)
सहभागी व्यक्तींपैकी ज्यांनी मध्येच चहा सोडला, त्या व्यक्तींमध्ये वय वाढण्याची प्रक्रिया तुलनेने अधिक वेगाने झाल्याचं या संशोधनात स्पष्ट झालं. अर्थात, हा रिसर्च केवळ 'ऑब्जर्व्हेशनल' असल्यामुळे परिणामांची नोंद ठेवण्यात आली. अँटी-एजिंग बेनिफिट्स हे फक्त चहामुळेच झाले असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.
सहभागी व्यक्तींपैकी ज्यांनी मध्येच चहा सोडला, त्या व्यक्तींमध्ये वय वाढण्याची प्रक्रिया तुलनेने अधिक वेगाने झाल्याचं या संशोधनात स्पष्ट झालं. अर्थात, हा रिसर्च केवळ 'ऑब्जर्व्हेशनल' असल्यामुळे परिणामांची नोंद ठेवण्यात आली. अँटी-एजिंग बेनिफिट्स हे फक्त चहामुळेच झाले असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.
संशोधकांनी असं म्हटलं आहे की या रिसर्चमध्ये त्यांनी चहाच्या विशिष्ट प्रकाराची नोंद घेतली नाही. अर्थात, चीनमधील चहा पिणारे लोक आणि ब्रिटनमधील चहा पिणारे लोक यांच्या अहवालांमध्ये फारशी तफावत दिसली नसल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच तुम्ही गरम चहा पिताय की कोल्ड-टी यामुळेही निष्कर्षात बदल होत नसल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, 'तीन कप' चहामध्ये कपाची साईजही संशोधकांनी विचारली नसल्याचं यात म्हटलं आहे.
चहामध्ये काय खास?
चहामध्ये असणारे पॉलिफेनॉल्स हे बायोअॅक्टिव्ह घटक हे आपल्या पोटातील बॅक्टेरियावर परिणाम करतात. याचा प्रभाव आपल्या इम्युन सिस्टीम, मेटाबॉलिझम आणि कॉग्निटिव्ह फंक्शनवर पडतो. पॉलिफेनॉलचाच एक प्रकार असलेल्या 'फ्लॅवोनॉईड्स'मुळे उंदरांचं आयुष्य वाढल्याचंही मागेच एका रिसर्चमध्ये सिद्ध झालं आहे