सांगली समाचार - दि. २५|०२|२०२४
मिरज - निवृत्त शिक्षक अनिल दबडे यांचा डॉ. अशोक माळी फाऊंडेशनतर्फे कलारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. सुशीलकुमार लवटे यांनी पुरस्कार प्रदान केला. फाऊंडेशनमार्फत कला श्रेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. डॉ. दबडे विविध दैनिकात व्यंगचित्रे रेखाटत असतात. शिवाय देश-विदेशात त्यांनी पेंटिंगची प्रदर्शन भरविली आहेत.
कार्यक्रमास साहित्यिक, कलाकार, शिक्षक, पालक उपस्थित होते. फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अशोक माळी, उपाध्यक्ष प्रा. सिद्राम माळी, सचिव डॉ. स्नेहलता माळी यांनी संयोजन केले.