सांगली समाचार - दि. २२|०२|२०२४
मुंबई - मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचेच माजी सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले. मनोज जरांगे पाटलांवर केलेले हे आरोप बारस्करांना भोवले आहेत. अजय महाराज बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहार जनशक्तीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात पक्षातल्या कुणीही न बोलण्याचे आदेशही बच्चू कडू यांनी दिले आहेत.
पक्षामध्ये कुणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण तसंच नेत्याबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये, असं केल्यास पक्षाचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध राहणार नाही, असं प्रहार जनशक्तीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मांडलेल्या भूमिकेचं प्रहार जनशक्ती समर्थन करत नाही, असं स्पष्टीकरण पक्षाने दिलं आहे. तसंच अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात येत आहे, असं प्रसिद्धी पत्रक प्रहार जनशक्ती पक्षाकडून काढण्यात आलं आहे.
बारस्करांचे जरांगेंवर आरोप
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी पैसे कुठून येतात? याची ईडी चौकशी करण्याची मागणी बारस्कर यांनी केली आहे. तसंच जरांगे पाटील यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा आरोपही बारस्कर यांनी केला. बारस्करांनी केलेल्या तुकाराम महाराजांच्या आरोपांवर जरांगे पाटील यांनी माफी मागितली आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी डबलगेम केला आहे. उपोषण करण्याकरता बैठक घेतली का? गुलाल घ्यायला जायचं म्हणाले होते. मुख्यमंत्री यावे यासाठी अट्टाहास केला. मराठा आंदोलनावेळी वाशीमध्ये बंद दाराआड काय चर्चा केली? असा आरोपही बारस्कर यांनी केला आहे.
जरांगेंवर बारसकरांचे सनसनाटी आरोप
मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार
जरांगे सरकारला निवेदन देत नाही
जरांगेसोबत हॉटेलमधील मिटींगचा साक्षीदार
मनोज जरांगेंनी डबलगेम केला
उपोषण करण्याकरता बैठक घेतली का?
'गुलाल घ्यायला जायचं म्हणाले होते'
'मुख्यमंत्री यावे यासाठी अट्टाहास केला'
जरांगे हा नाटकी माणूस
जरांगेंना काडीची अक्कल नाही
जरांगे समाजात द्वेष पसरवतात
वाशीत बंद खोलीत काय चर्चा केली?
जरांगे कलाकार आहे
'जरांगे स्वत:ला मोठं समजतात'
'जेसीबीतून फुलं उधळायला पैसे कोण देतं?'
'मला मारलं तरी खरं बोलणार'
'जरांगेंनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली'
'जरांगेंचे अश्रू मगरीचे अश्रू'
'लक्ष कसं वेधून घ्यायचं त्याला माहितीय'
'जरांगे लोकांची फसवणूक करतो'
'टीआरपी कसा मिळेल त्याला माहितीय'
'जरांगेंना भाषा शोभते का?'
'जरांगे लोकांची फसवणूक करतो'
'जरांगेंना कुणाचा फोन आला होता?'
'जरांगेंनी तुकोबांचा अपमान केला'
'तुकोबांचा अपमान सहन करणार नाही'
'मराठा समाज रस्त्यावर आलाय'
'समाज आतून पेटलाय त्याची कारणं वेगळी'