सांगली समाचार - दि. २९|०२|२०२४
सांगली - कोल्हापूर सत्यावरील एक घरातून सोन्याचे दागिने घेवून पसार झालेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांला सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जेरबंद केले, त्याच्याकडून थोरीतील ७३ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून आता चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस चौकशीत आणखी काही गुन्द्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील माने प्लॉट परिसरात सुधीर सुरेश चौगुले राहतात. त्यांचे सौंट्राचा व्यवसाय आहे. बुधवार दि. २९ रोजी सकाळी ९ ते रात्री ८.३० या कालावधीत चोरट्याने घराचे कुलूप उबकटून आत प्रवेश करुन आतील दागिने घेवून पोबारा केला होता, शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेस एक आपवयीन विद्यार्थी शहरातील सराफ कट्टा येथे चोरीचे दागिने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी परिसरात सापळा लावला होता. काही वेळाने तेथे एक अल्पवयीन विद्यार्थी संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला तब्यात घेवून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. सदरची कारवाई पोलीस उपनिरिक्षक महादेव पोवार, पोलीस कर्मचारी संदिप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळये आदीनी सहभाग घेतला. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून पोलिसांनी ४२ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे नेकलेस, ३० हजाराचे १० ग्रॅम बजनाची कर्णफुले आणि १ हजार रुपये किमतीचे लहान मणी असे सोन्याचे दागिने छतगत केले.