सांगली समाचार - दि. ११|०२|२०२४
सांगली - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात चोरी घरपोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून, या गुन्हेगाराकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीची पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
दादा बब्रुवान पवार (वय 45, राहणार पाथर्डी, ईटकुर, जिल्हा धाराशिव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्ह्यात झालेल्या घरपोडी चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक श्र. शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. हे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील सागर लवटे यांना सराईत गुन्हेगार दादा पवार कुमठे फाटा येथे चोरीचे एलईडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला, यावेळी एक जण दुचाकीवर दोन एलईडी ठेवून उभे असल्याचे पथकाला दिसून आले पथकाने तातडीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर, त्याने एलईडी तांदूळवाडी येथून, तर दुचाकी हातकणंगले येथून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आली असून, गुन्हेगारास कुरळप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबी चे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिबोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली