सांगली समाचार दि. ११|०२|२०२४
नवी दिल्ली - 2014 मध्ये राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांचा चेहरा पुढे करून भारतीय जनता पक्षाने अनेक विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही नेत्रदीपक विजय मिळाला होता. 2024 ची लोकसभा निवडणूक ही पंतप्रधान मोदींसाठी शेवटची लोकसभा निवडणूक असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा तऱ्हेने भाजपमध्ये त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याबद्दल वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात.
सध्या देशात लोकसभा निवडणूकांची तयारी सुरू आहे. यादरम्यान 'मूड ऑफ द नेशन'च्या ओपिनियन पोलमध्ये पंतप्रधान मोदीयांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभा निवडणुकीत सलग तिसरा विजय सहज जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, सर्वेक्षणादरम्यान लोकांना पंतप्रधानांच्या उत्तराधिकारी कोण असेल याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले होते.
या सर्वेक्षणानुसार, 29 टक्के लोक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधान मोदींच्या राजकीय उत्तराधिकारीसाठी सर्वात योग्य मानतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 25 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्यापेक्षा मागे आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 16 टक्के लोकांनी गडकरी यांना पाठिंबा दिला आहे.
या ताज्या सर्वेक्षणात लोकसभेच्या सर्व जागांवरील तब्बल 35,801 लोकांनी सहभाग घेतला होता. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत घेण्यात आले होती.
2014 नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यापासून पीएम मोदे हे देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. पंतप्रधान मोदी हे भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत यात शंका नाही, परंतु भाजपला निवडणूकीत विजय मिळवून देण्यामागे अमित शाह यांचा मेंदू असल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपचे 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचे काटेकोर नियोजन आणि पक्षाध्यक्ष म्हणून राजकीय चातुर्य यामुळे भाजपचा विजय निश्चित होत आला आहे.
Pakistan Election Results: 75 वर्ष... 29 पंतप्रधान..एकाचाही कार्यकाळ पूर्ण नाही; पाकिस्तानच्या लोकशाहीची शोकांतिका!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण करणारे योगी आदित्यनाथ यांचे महत्व पक्षात झपाट्याने वाढत आहत. कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रीयता वाढत आहे. हिंदुत्वाचे प्रखर प्रचारक आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपला यश मिळवून देण्यासत त्याचा मोठा हातभार असून त्यांची लोकप्रियता देखील प्रचंड आहे.
दरम्यान भाजपमध्ये असाही एक नेता आहे, ज्याने सर्वच राजकीय पक्षांची वाहवा मिळवली आहे. ते म्हणजे नितीन गडकरी. काम करणारे राजकारणी अशी ओळख असलेले गडगरी हे नेहमी चर्चेत असतात. परिवहन मंत्री म्हणून गडकरी यांनी केलेल्या कामाबद्दल आणि देशभरात महामार्गांचे जाळे विस्तारल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी देखील अनेकदा त्यांचे कौतुक केले आहे.