yuva MAharashtra नाथांची कन्या भाजपात कायम अनाथ : आता घेणार वेगळी भूमिका

नाथांची कन्या भाजपात कायम अनाथ : आता घेणार वेगळी भूमिका





सांगली समाचार दि
१२|०२|२०२४

बीड - महाराष्ट्रात ज्यांनी बीजेपीची बीजे रोवली, फुलवली, त्या गोपीनाथ मुंडे याची सुकन्या, ज्यांनी आपल्या पित्याच्या अकस्मात निधनानंतर कमळ हाती घेतलं आणि ओबीसीची मते वोटबॅकेत कायम डिपॉझिट करण्याची महत्वाची भूमिका बजावली, त्या पंकजा मुंडे भाजपाच्या राज्यातील नेतृत्वामुळे साईट ट्रॅकवरच राहिली. त्यांचं महत्व वाढू न देण्याचं कटकारस्थान रचलं गेलं. आताही पुन्हा एकदा त्यांचा पत्ता कट करण्यात येत असल्याने राजकीय वनवास घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. या बाबतची खंत त्यांनी स्वतःच व्यक्त करून खुबी उडवून दिली आहे.

तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला आज इथे कुंकू लावलं, मला कडक लक्ष्मीचे रूप दिले. हे प्रेम मी कायम लक्षात ठेवेन असे भावनिक उद्गार काढले आहेत.



पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी गेल्या आहेत. त्यांचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना हे मोठं वक्तव्य केलं.

रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले. ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो. रामाला वनवास भोगावा लागला. मी आज माहेरसिन म्हणून इथ मुकामी आले आहे. ताईचं काय? म्हणून मला सर्व लोक विचारतात. मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात. माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागणार नाही असे मला काम करायचे आहे. राम वनवासात गेले नसते तर प्रभू झाले नसते. माझ्या सहकारी आमदारांच्या मुलाला गोळी घालून मारले, मला खूप वाईट वाटले. माझ्या संघर्षात नेहमी सोबत आहात म्हणून माझा संघर्ष सोन्यासारखा झाला आहे. पुढील संघर्षात देखील तुम्ही माझ्यासोबत राहा”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंआहे.

आता पुढील काळात पंकजाताई काय भूमिका घेतात याकडे त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम करणा-या केवळ बीड तालुक्याचं नव्हे, तर राज्यभरातील ओबीसी जनतेचं लक्ष लागून राहिले आहे.