yuva MAharashtra मोबाईल पाहणाऱ्या विविध राशीचे लोक !

मोबाईल पाहणाऱ्या विविध राशीचे लोक !




सांगली समाचार  दि. ०८ | ०२ |२०२४

📕 😳 मेष - बेधडक प्रत्येक ग्रुप  
वर डोके आपटणारी रास 
सगळेच मेसेज यांना आवडतात. 
परंतु सहसा फॉरवर्ड करत नाहीत.
------------------------
📗 😁 वृषभ - दर अर्ध्या तासाला 
अपडेट मेसेज. यातच त्यांचा 
इतका वेळ जातो की बाकीच्यांचे 
मेसेज या राशी पहात नाहीत.
------------------------
📘😜 मिथुन - या राशींचा मेसेज 
न पाठविता चँटींग करण्यावर 
जोर असतो. गप्पा मारतात 
आणि कुणी नसेलच बोलायला 
तर उगाच "काय आहेस कुठे 
मित्रा / मैत्रिणी विसरलास / विसरलीस 
गेल्या सोळा तासात एकपण 
मेसेज नाय तुझा" अस म्हणत 
सगळ्या काँटँक्ट ना हाकत सुटतात...
------------------------
📙😵 कर्क - फार कनवाळु रास 
आपल्यामुळे कुणाला त्रास नको 
म्हणुन प्रत्येक मेसेज स्विकारतात. 
प्रत्येक पोस्टला लाईक 👍 
करुन कमेँट करतात. दुस-याचे 
मेसेज तिस-याला फाँरवर्ड करतात. 
पण यांच्या मेसेज ला जर तुम्ही 
चुकुन कमेँट नाही दीली तर मनाला 
लावुन घेतात मग कितीतरी महिने 
मेसेज पाठवित नाहीत.
-------------------------
📕 😎 सिँह - या राशीला फक्त 
स्तुती आवडते. हे फक्त लाईक 
👍 केल्याबद्दलही धन्यवाद 
देतात ." वा छान "या दोन शब्दांनीही 
हुरळुन जातात आणि मी तुमचा 
ऋणी राहीन म्हणतात. प्रत्यक्षात तो 
मेसेज श्रधांजलीचा का असेना 
यांना त्यावर कमेँट 👍 असली 
की झाले
-------------------------
📗 😜 कन्या - वृषभप्रमाणे हे 
नुसते दर पंधरा मीनिटाला  
मेसेज फाँरवर्ड करतात. फरक 
इतकाच की वृषभ वाले सगळं 
शोधुन हे मात्र तयार रि-शेअर 
करतात अगदी प्रत्येक.
------------------------
📘☺ तुळ - " ठेविले अनंते तैसेची 
रहावे " या उक्तीवर जगणारी 
कधी कुणाला कमेँट नाही, 
मेसेज नाही, पहिल्या दिवशी 
लावलेला प्रोफाईल पिक्चर.. 
तोच जुना फोटो बदलत नाहीत 
जुनाट विचारामुळे नवीन व्हर्जन 
कधीच वापरत नाहीत....
-------------------------
📙 🤣 व्रुश्चिक - प्रत्येक मतावर 
विरुद्ध मताची मेसेज प्रत्येकाशी 
भांडण हा यांचा छंद आणि 
व्यवसाय पण यांच्या मेसेज 
कुणी विरुद्ध मत मांडल तर 
खपवुन घेत नाहीत तोंडाला 
फेस आल्या शिवाय सोडत 
नाहीत तुम्हाला...
----------------------
📕😃 धनु - फक्त मोठेपणाचा 
सोस असतो यांना सगळे सेलिब्रेटी 
फोटोज आणि त्यांचे व्हिडीओज 
असतात.बाकी मेसेज मध्ये यांना 
रस नसतो यांना फक्त सेलेब्रिटी 
लागतो...
------------------------
📗😚 मकर - यांना मित्रपरिवार 
कमी असतो. कारण हे वांटस 
अँप पेक्ष गुगल सर्चवर पडीक 
असतात आणि चुकुन आलेच 
तर चैतन्याचे आदिमुळ बीज 
आत्मा स्वरुप आहे असा 
मेसेज करुन निधुन जातात.
-----------------------
📘😇 कुंभ - परोपकारी राशी 
आपल्या वाँटस अँप वापरण्याने 
सर्वाना रोजगार मिळाला अशी 
यांची भावना सतत प्रत्येकाला 
मदत करतात. जे आवडलं 
त्यावद्दल भरभरुन बोलतात 
आणि आवडल नसेल तर न 
बोलता शांत बसतात.
----------------------
📙😎 मीन - खाओ पिओ मजा 
करो हा यांचा स्टेटस मेसेज हे 
कधीच नेट डिसकनेक्ट  
करत नाही ....

आपली रास तपासून पहा बरोबर आहे ना😜