सांगली समाचार - दि. २९|०२|२०२४
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ सनदी अधिकारी एस चोकलिंगम यांची तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्या हाती आता राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी असणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 1996 बॅचमधून प्रशासकीय सेवेत आलेले सनदी अधिकारी एस. चोकलिंगम यांची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सद्या या जागेवर सनदी अधिकारी श्रीकांत देशपांडे कार्यरत आहेत. तसेच राज्य सरकारनं माजी सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे.