yuva MAharashtra विविध मागण्यासाठी एस. टी. कर्मचाऱ्यांचे उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

विविध मागण्यासाठी एस. टी. कर्मचाऱ्यांचे उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

 


सांगली समाचार - दि. १४|०२|२०२४

सांगली - महागाई भत्त्याची, वेतनवाढीची थकबाकीची शासकीय कर्मचा-यांइतके वेतन देण्यासह सातवा वेतन लागू करावा, यासह हिट ऑर्डर रचना कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेने उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

एस. टी. कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सचिव हणमंत ताटे यांनी राज्यात आंदोलन पुकारले आहे, त्यानुसार सांगलीतील एस. टी. च्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचा-यांनी उपोषण सुरू केले आहे. 



एस्. टी. कामगारांच्या मागण्याबाबत शासन आणि एस. टी. प्रशासनाच्या पातळीवर निर्णय घेण्यात आले होते. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

महागाई, घरभाडे, वेतनवाढ थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच हिट ॲण्ड रनचा कायदा धोकादायक आहे, तो रद्द करण्यात यावा, मूळ वेतनातील तफावत दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार रू. द्या, शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सातवा धेनकनाल आयोग लागू करावा, या प्रमुख मागण्यांसह इतरही अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी नारायण सुर्वे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.