मिरज - धार्मिक भावना भडकवून गरिबांची पोट भरता येत नाहीत, निवृत्त पेन्शन किमान नऊ हजार रुपये करावी, अशी मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.
देशभरातील 186 आस्थापनातील निवृत्त कर्मचाऱ्यांनी औद्योगिक व सेवा व्यवसायात आपले महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांना तुटपुंजे वेतन देऊन, त्यांचे शोषण करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर नाही. धार्मिक भावना भडकावून गरिबांची पोटे भरत नाहीत. संविधानाने कर्मचाऱ्यांना दिलेले हक्काचे अधिकार हिसकावून घेऊन, केंद्रातील भाजपा सरकारने बुरे दिन आणण्याचे पाप केले आहे, असा घणाघात यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी केला. आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मी पेन्शनर्स असोसिएशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर आहे असे त्यांनी म्हटले.
सांगलीला ईपीएस पेन्शनर्स असोसिएशनने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पृथ्वीराज पाटील उपस्थित झाले होते. यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील यांनी प्रस्ताविकात पेन्शनच्या व्यथा मांडल्या. या धरणे आंदोलनात सांगली जिल्ह्यातील 180 आस्थापनातील निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते