yuva MAharashtra लंबा बाल, मुंबई का बंदर, नमक का पार्सल तस्करांची कोड लँग्वेज उघड

लंबा बाल, मुंबई का बंदर, नमक का पार्सल तस्करांची कोड लँग्वेज उघड

 

सांगली समाचार  - दि. २२|०२|२०२४

मुंबई  - पुण्यातून राज्यासह देशभरात मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींनी नावांचे काेडिंग केले होते. त्याद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लंबा बाल, मुंबई का बंदर, नमक पार्सल अशा स्वरूपाच्या कोडिंगद्वारे अमली तस्कर संपर्कात होते. दरम्यान, मेफेड्रॉन तस्करी प्रकरणात आठजणांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल 1 हजार 836 किलोवर एमडी जप्त केले असून, त्याची पिंमत तब्बल 3 हजार 674 कोटींवर आहे. नवी दिल्लीतून 970 किलो, सांगलीतून 150 किलो, पुण्यातून 717 किला एमडी जप्त केले आहे.

वैभव माने (रा. सोमवार पेठ), अजय करोसिया (रा. भवानीपेठ), हैदर नुर शेख (रा. विश्रांतवाडी,) भिमाजी साबळे (रा. पुणे), युवराज भुजबळ (रा. डोंबिवली वेस्ट), दीवेश भुटिया (रा. नवी दिल्ली), संदीप कुमार (रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी टोळीने टोपण नावे तयार केली होती. सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती. त्यामुळे त्याला लंबा बाल म्हणून ओळखले जात होते. तर मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला मुंबई का बंदर म्हणून बोलावले जात होते. तर मेफेड्रॉनची तस्करी मिठाच्या गोण्यांमधून केली जात होती. प्रत्येक 30 ते 40 किलो मिठाच्या गोणीत एक किलो मेफेड्रॉनचा बॉक्स ठेवून नमक पार्सल असे कोडिंग केले जात होते. आरोपींचा मोबाइल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला काsंडिंगची उकल करण्यात यश आले आहे.

पुणे पोलिसांनी वैभव माने याला मोटारचालकासह ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 कोटी 58 लाख रुपयांचे तर विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून 55 किलो एमडी जप्त केले. आणखी माहितीनुसार कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीत छापा टाकून 662 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. तर सांगलीतून 150 किलो एमडी जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली.