सांगली समाचार दि. १२|०२|२४
अहमदनगर - राज्यात काही राम राज्य राहिलेले नाही. या सरकारच्या राज्यात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. तसेच गरीब जनता पिसली जात आहे. अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या निश्चय दौऱ्याच्या निमित्ताने सातारा, माढा, शिरूर, अहमदनगर या लोकसभा मतदार संघाचा दौरा करीत, अहमदनगर येथे पक्ष कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते.
5 फेब्रुवारीपासून सुरू झालेला आहे तब्बल आठ तारखेपर्यंत चालला. यावेळी ठिकठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकारवर सडकून टीका केली. ज्यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, एक आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो, एक आमदार मंत्र्यांच्या फेकातात लाथ घाला म्हणतो, परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर काहीच भाष्य करीत नाहीत, हे राजकारणासाठी व राज्यासाठी घातक आहे. नजदीपदावर असणाऱ्या माणसाबद्दल असे बोलले जात असेल, तर परिस्थिती काय आहे हे आपल्या लक्षात येईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर येथील मेळाव्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आ. अशोक पवार, आ. रोहित पवार, आ. प्राजक्त तनपुरे, तसेच सातारा सोलापूर अहमदनगर पुणे जिल्हाध्यक्ष, बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.