सांगली समाचार - दि. २३|०२|२०२४
जालना - महाराष्ट्र सरकारने दिलेले दहा टक्कयाचे आरक्षण नाकारून आंदोलन पुकारले आहे. 24 तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आंदोलन करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना दिला आहे. आपल्या आंदोलनाचा विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना त्रास होता कामा नये, असे म्हटले आहे, आपले आंदोलन हे सरकार, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षाचे स्थानिक नेते यांच्या विरोधात आहे. त्याला वेठीस धरा, परंतु जनतेला आपला त्रास होऊ नये.
जरांगे पाटील यांच्या या भूमिकेबद्दल जनतेतून कौतुक होत असले तरी, आता ते थेट लग्नाच्या मांडवात पोहोचलेले आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल आवाहन करताना जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की , ३ तारखेला लग्नाचे मुहूर्त आहेत. ज्यांचे लग्न आहे त्यांना विनंती आहे. दुपारी आणि संध्याकाळी मुहूर्त आहेत. दुपारचे लग्न संध्याकाळी ढकलायचा प्रयत्न केला तर गैरसोय होणार नाही. त्यामुळे सगळ्या धर्माच्या लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा," असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठा आरक्षणाबद्दल पुकारलेल्या आंदोलनाचा जनतेला त्रास होऊ नये, ही भावना चांगली असली तरी, लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे आवाहन करणे ही कितपत योग्य आहे ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.