Sangli Samachar

The Janshakti News

जैन समाजाने एकत्र येवून एकसंघ राहणे गरजेचे - प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी

स्तवनिधी येथे वीर सेवा दलाचा 45 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न



सांगली समाचार दि. १०|०२|२०२४

स्तवनिधी- एक सशक्त, व्यसनमुक्त, संस्कारमय युवा पिढी तयार व्हावी यासाठी दिलेले योगदान आज महत्वपूर्ण ठरत असून द. भा. जैन सभा व वीर सेवा दलाने देशाच्या व समाजाच्या उन्नतीसाठी करीत असलेले कार्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन द.भा.जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न, जिनधर्म प्रभावक रावसाहेब पाटील दादा यांनी स्तवनिधी येथे आयोजित वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले.

प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज व वीराचार्य बाबासाहेब कुचनूरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन प.पू. स्वस्तिश्री जिनसेन महाराज यांच्या पावन उपस्थितीत द.भा.जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील (दादा), द.भा.जैन सभा चेअरमन रावसाहेब पाटील, डॉ.अजित पाटील, अरविंद मजलेकर, वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हा.चेअरमन सुभाष मगदूम, सेक्रेटरी अजितकुमार भंडे, जॉ.सेक्रेटरी अभय पाटील, मुख्य संघटक सुनिल पाटील, भूपाल गिरमल, शशिकांत राजोबा, महामंत्री डॉ.रावसो कुन्नुरे, महिला विभाग बेळगाव विभाग सौ.अनिता पाटील, श्री क्षेत्र कमिटी स्तवनिधीचे चेअरमन तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे स्वागत वीर सेवा दल व्हा. चेअरमन सुभाष मगदूम यांनी केले तर प्रास्ताविक सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांनी करताना 45 वर्षाच्या वीर सेवा दल कार्याचा आढावा घेतला. द.भा.जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि. पाटील, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे पावन सानिध्य लाभले. यावेळी मंगल आर्शिवचन देताना प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराजांचे आचार विचार केवळ समाजापर्यंत नव्हे तर साèया विश्वापर्यंत पोहचवणे, मुनि, साधू यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सध्या युवापिढीमध्ये उत्तम संस्काराचा अभाव दिसून येत आहे. याला आवर घालण्यासाठी वीर सेवा दलाच्या माध्यमातून व्यसन मुक्तीसाठी व आदर्श संस्कारासाठी सातत्याने बरेच कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच वीर सेवा दलाच्या माध्यमातून संस्कार, आरोग्य व शिक्षण यासह अनेक सामाजिक उपक्रमातून अनेक वर्षापासून चालू असलेले कार्य कौतुकस्पद असल्याचे सांगितले. तसेच प.पू. महाराजजी यांनी संपूर्ण भारत देशातील जैन समाजाने एकत्र येवून आपण एक संघ राहणे गरजेचे आहे असे सांगितले. 

या 45 वा वर्धापन दिनानिमित्त श्रावकरत्न रावसाहेब पाटील दादा यांना नुकताच कर्नाटक जैन असोसिएशन यांच्यावतीने जिनधर्म प्रभावक पदवीने सन्मानीत केल्याबद्दल वीर सेवा दलाच्या वतीने स्तवनिधी येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी स्व.वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या जीवनावरील वीराचार्य स्मृती ग्रंथ या कन्नड भाषेत भाषांतर केलेल्या एस.टी.लगारे यांचा करुन प्रकाशन करण्यात आले. वीर सेवा दलाच्या सन 2024 सालाचे प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांचे छायाचित्र असलेले कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच वीर सेवा दलाच्या जडणघडणीत सन 1979 ते 2023 पर्यंत योगदान दिलेल्या 65 वर्षावरील कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. तसेच सन 2024 सालाकरिता वीर सेवा दल शाखेमध्ये उच्चांकी सदस्य नोंदणी यासाठी वीर सेवा दल शाखा माणगांव (358), बेडकिहाळ (335) व नांद्रे (275) या शाखेचा ‘‘चेतना सन्मान’’ करण्यात आला. 

याप्रसंगी वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन एन.जे.पाटील, श्री क्षेत्र कमिटी स्तवनिधीचे सेक्रेटरी बी.ए. मगदूम, जॉ.सेक्रेटरी आनंद उगारे, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सहकार्यवाह, मध्यवर्ती सदस्य, प्रांतिय, जिल्हा व तालुका समितीचे सदस्य, अनेक शाखांचे संघनायक व शाखा सदस्य, वीर सेवा दल प्रवर्तित शैक्षणिक, आर्थिक संस्थेचे पदाधिकारी, संचालक, परिवार सदस्य, स्वयंसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन उपाध्ये, प्रियंका कोथळे, सुरेखा कोथळे यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजक वृषभ बाळीकाई यांनी आभार मानले.