yuva MAharashtra गुंडभेटीचं पुत्राभोवतीच्या वादळानंतर अजितदादा अडकले भेटीच्या वावटळीत ?

गुंडभेटीचं पुत्राभोवतीच्या वादळानंतर अजितदादा अडकले भेटीच्या वावटळीत ?





सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच घरी गेल्याचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच अनेक गंभीर गुन्हे नोंद असलेला पिंपरी-चिंचवडमधील नामचीन गुंड आसिफ दाढी
खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला गेल्याने जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. आसिफ दाढीला पोलिसांनी घातक शस्त्रास्त्रांसह मध्यंतरी अटक केली होती.

आसिफ दाढीचे अजितदादांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतल्यासंबंधीचे फोटो समाजमाध्यमातून समोर आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अर्थात विरोधकांनी ही वावटळ अजितदादांना बदनाम करण्यासाठी उठवल्याचे अजितदादांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

अनेक लोक निवेदन देण्यासाठी सत्ताधा-यांना भेटत असतात. यामध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोक असतात. यापूर्वी अनेक मोठमोठ्या राजकारण्यांना गुंड प्रवृत्तीचे लोक भेटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच ही बाब गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे या निकटवर्तीय व्यक्तीने म्हटले आहे.