yuva MAharashtra आंतरराष्ट्रीय दर्जाचे अकल्पनीय सांगली रेल्वे टर्मिनल पंतप्रधानांच्या होते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या उदघाटन

आंतरराष्ट्रीय दर्जाचे अकल्पनीय सांगली रेल्वे टर्मिनल पंतप्रधानांच्या होते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या उदघाटन


सांगली समाचार  - दि. २६|०२|२०२४

सांगली - प्रधानमंत्री मोदी जी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सांगली रेल्वे स्टेशनच्या अमृत भारत योजनेअंतर्गत होणाऱ्या रीडेव्हलपमेंटच्या उद्या सकाळी 10 वाजता शुभारंभ होणार आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी अम्रृतभारत रेल्वे स्टेशन योजना सुरू करण्यात आली आहे. खासदार संजय काका पाटील यांनी रेल्वे तज्ञांमार्फत अभ्यास करून सांगली जिल्हा मुख्यालय तसेच जागतिक हळदी नगरी म्हणून ओळखले जाणारे सांगली रेल्वे स्टेशनवर कुठल्या कुठल्या आधुनिक सुविधा द्याव्या याबाबत रेल्वेमंत्रीना सूचना केल्या होत्या व सविस्तर निवेदन दिले होते. त्यातील बहुतेक सर्वच मागण्या रेल्वेमंत्र्यांनी मंजूर करून सांगली येथे एक अतुलनीय भव्य दिव्य अकल्पनीय रेल्वे टर्मिनल साकारण्यास मंजुरी दिली आहे. त्याबाबत खासदार संजय काका पाटील यांनी प्रधानमंत्री मोदीजी, रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे राज्यमंत्री दर्शना जर्दोष यांचे आभार मानले आहे. 

सांगली स्टेशन अम्रृत भारत स्टेशन रिडेवलपमेंटचा शुभारंभ होईल. याची ठळक वैशिष्ठये

सांगलीत 7 चकचकणारे प्लॅटफाॅर्म (प्रवासी गाड्यांचे 5 प्लॅटफाॅर्म व मालगाड्यांचे 2 प्लॅटफाॅर्म) सांगली स्टेशनवर तयार आता सांगली स्टेशनवरुनच ब-याच नवीन रेल्वे गाड्या सुरू करता येणे शक्य होईल.

प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर लिफ्ट व सरकता जिना(एस्कलेटर) प्रवाशांची होणार मोठी सोय.

12 मिटर रुंद पादचारी पुल प्लॅटफाॅर्म 1, 2, 3, 4, 5 ला जोडणार

सांगली स्टेशनला मिळणार दुसरे प्रवेशद्वार

प्लॅटफाॅर्म 4/5 पासून पादचारी पुल मालधक्यापलिकडे स्टेशनच्या पूर्व बाजूला जाईल

कुपवाडकरांचे पूर्व दिशेने सांगली स्टेशनवर येण्याचे स्वप्न साकार

विश्रामबाग, माधवनगर, सह्याद्रीनगर, संजयनगर, अभयनगर येथील नागरीकांसाठी सोय

हमालांची मोठी सोय

हा पादचारी पुल सर्वच 7 प्लॅटफाॅर्मना जोडणार असल्याने स्टेशनच्या पूर्व व पश्चिम दोन्ही बाजूने येता येईल. मालधक्यातून मार्केट यार्ड जाणे हमालांना सोयीस्कर व वेळ वाचेल.

प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर पूर्ण कवर छत

ऊन-पावसापासून प्रवाशांचा बचाव

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेशन टर्मिनल ईमारत सह 4 नविन प्रशस्त प्रतिक्षालय(वेटींग रूम)

व्हाआयपी लाॅज

द्वितीय श्रेणी प्रतिक्षालय

उच्च श्रेणी प्रतिक्षालय

महिलांसाठी स्वतंत्र प्रतिक्षालय

बाळाला दुध पाजवण्यासाठी स्वतंत्र वात्सल्य कक्ष

नविन प्रशस्त संगणक आरक्षण केंद्र

प्रशस्त जनरल तिकीट बुकींग काऊंटर

स्टेशन अप्रोच रोडचे रुंदीकरण व प्रचंड मोठे पार्कींग

*जागतीक हळदी नगरीला सुशोभित करणारी अतुलनीय अकल्पनीय स्वागत कमान*

दिवंयांगजनांसाठी स्वतंत्र शौचालय

प्रशस्त पार्कींग व अप्रोच रोड

दुचाकी, रिक्षा, चारचाकी, खासगी टॅक्सी, खासगी बस व एसटी बस थांबू शकतील तेवढे मोठे पार्कींग

भव्य प्रवेशद्वार

सांगली जिल्हाचा सांस्क्रृतिक ईतिहास व वारसा स्टेशनवर झळकेल.

प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर डिजिटल ट्रेन ईंडीकेटर, कोच ईंडीकेटर व विडीयो डिस्प्ले

नजिकच्या काळात रास्त दरात राहणेसाठी रिटायरिंग रुम व रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची तरतूद

सांगली रेल्वे स्टेशनचा प्रचंड मोठा विस्तार करत सांगली रेल्वे स्टेशनवर एकूण 7 प्लॅटफॉर्म बांधण्यात आले असून यापैकी 5 प्लॅटफॉर्म प्रवासी गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहेत व दोन प्लॅटफॉर्म माल गाड्यांसाठी वापरण्यात येणार आहेत. यापुढे सांगली रेल्वे स्टेशन वरून बऱ्याच नवीन गाड्या सुरू होण्यास मदत होणार आहे. सांगली रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम क्लॉक रूमवर रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्याची मागणी ही खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे व ती मागणीदेखील रेल्वेमंत्र्यांतर्फे लवकर मंजूर होईल. सांगली रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य उमेश शहा व सुकुमार पाटील यांनी खासदार संजयकाका यांच्या मार्फत वेळोवेळी सविस्तर मागण्या व तांत्रिक दृष्ट्यांची तपासणी करून रेल्वे अधिकाऱ्यांशी मुंबई व पुणे येथील मध्य रेल्वेच्या कार्यालयांमध्ये अनेक बैठकी घेऊन हे मुद्दे मंजूर करून घेतले. खासदारांनी सांगली रेल्वे स्टेशन विकासासाठी गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक वेळा रेल्वेमंत्री व रेल राज्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सांगली स्टेशनचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यातूनच हा सांगली रेल्वे स्टेशनचा अमृतभारत योजनेतील मोठा विकास साकारतोय याबद्दल जिल्ह्यातील लोकांमध्ये आनंद व उत्सवाचे वातावरण पसरलेले आहे.