सांगली समाचार दि. १२|०२|२०२४
पुणे - कालपर्यंत जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जोरदारपणे ओबीसींची बाजू मांडणारे, ओबीसींचे नेते बनविणारे ना. छगन भुजबळ यांनी आपली भूमिका बदलली की काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. निमित्त ठरले येथे पुणे येथील पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या युवक मेळाव्यातील त्यांचे भाषण.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच माझीही भूमिका आहे. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात नवा कायदा येणार आहे. या कायद्याला खंबीर पाठिंबा आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचे आपले स्वप्न असून, त्यांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचे आहे, असे विधान छगन भुजबळ यांनी पुण्यात रविवारी केले. यावरून नागरिकांच्या भुवया उंचावल्या.
शरद पवारांना सल्ला
जाता भुजबळ यांनी शरद पवारांनाही सल्ला द्यायला विसरले नाहीत. आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी पुनर्विचार करावा. पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवे, असे भुजबळ म्हणाले.