सांगली समाचार - दि. १९|०२|२०२४
सांगली - काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील मोटारसायकलींचे कानठळ्या बसवणारे सायलेन्सर जप्त करून, त्यावरून चक्क रोडरोलर फिरवत ते चक्काचूर करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आल्याने धुळेकरांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे शहरातील कही तरुण बुलेट आणि इतर महागड्या मोटारसायकलीवर अल्टर करुन, फटाके फोडणारे आणि कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून शहरातून सुसाट फिरत होते. यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले होते. पोलिस अधीक्षकांनी श्रीकांत धिवरे यांनी याची दखल घेत, असे सायलेन्सर जप्त करून येथील संतोषी माता चौकात त्यावर चक्क रोडरोमिओ फिरवला. हे सायलेन्सर बसवलेल्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. चक्काचूर केलेल्या या सायलेन्सरची किंमत तीन लाखाहून अधिक होती. त्यामुळे असे सायलेन्सर बसवलेल्या इतर मोटारसायकलस्वार धाबे दणाणले आहेत.
कानठळ्या बसवणाऱ्या सायलेन्सरचा आवाज काढीत गल्लीबोळातून फिरणा-या छचोर "सायलेन्सर बहाद्दरांवर" सांगली पोलीस का ? असा प्रश्न आता उपस्थित होतो.