Sangli Samachar

The Janshakti News

अशोक सराफ म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी

 

सांगली समाचार - दि. २३!०२!२०२४

मुंबई - मराठी सिने व नाट्यसृष्टी गाजवलेलं अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारने आज (२२ फेब्रुवारी) गौरविण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर उपस्थित मान्यवारांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट भूषण पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळेस ते म्हणाले, “सर्व पुरस्कारप्राप्त गौरवमूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. अष्टपैलू हा शब्द ज्यांना लागू होतो ते म्हणजे अशोक सराफ खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज त्यांना प्राप्त होतोय. त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सलग पन्नास वर्ष असंख्य भूमिका करून देखील, ज्यांच्या अभिनयाची आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची भूक आजही कायम आहे. मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ७५ वर्ष झाली तरी सुद्धा ते अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे. खरं म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठी मातीला आणि मराठी माणसाला तुमचा सार्थ अभिमान आहे.” 

अशोक सराफ म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. गेल्या ४ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून अशोक सराफ अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचं नाव अत्यंत अदबीने घेतलं जातं. आज अशोक सराफ यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना अशोक सराफांवर स्तुतीसुमने उधळली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक सराफ म्हणजे मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. गेल्या ४ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवत आहेत. कधी विनोदी, कधी गंभीर, तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून अशोक सराफ अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्यांचं नाव अत्यंत अदबीने घेतलं जातं. आज अशोक सराफ यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना अशोक सराफांवर स्तुतीसुमने उधळली.