सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४
नाशिक - रामायण, महाभारत याशिवाय आपल्या देशाचा इतिहास पुराच होऊ शकत नाही. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा रामायण भारताचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा यातील पात्रे समोर उभे ठाकतात. रामायणातील असंच एक पात्र जटायू. जटायुची कथा आपण अनेकदा वाचली व टीव्ही सिरीयल मध्ये पाहिलीही आहे. रक्तबंबाळ जटायुने आपले प्राण सोडले, तेव्हा रामाने त्याचा विधीवत अंत्यविधी केला. परंतु आपणास ठाऊक आहे का, हे ठिकाण कुठे आहे ?
ज्या ठिकाणी जटायूचे अंत्यविधी केला, ते ठिकाण खूप दूर नाही. नाशिक जवळच्या टाकेड गावात असलेल्या गोदावरी नदी तीरावर हे ठिकाण असून याला सर्व तीर्थ म्हणून ओळखले जाते. आपण कधी नाशिकला गेलात, तर या ठिकाणाला आवश्यक भेट देऊन या.