सांगली समाचार दि. ११|०२|२०२४
पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०२३-२४ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने २०२३-२४ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे, असे पीटीआयने शनिवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या वर्षी २८ मार्च रोजी २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. आता व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.