सांगली समाचार दि. १५|०२२०२४
सांगली - तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील बंद घर फोडून फरार झालेल्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बानेसरकार उर्फ सागर तेगर पवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दागिने व मोबाईल्स ३७ हजार रुपयांहून अधिक रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत असता, पथकातील कर्मचारी सोमनाथ गुंडे यांना माहिती मिळाली की, घर फोडी केलेली एक व्यक्ती चोरीतील मुद्देमाल विकण्यासाठी ही व्यक्ती मिरज कोल्हापूर रोडवर येणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील नवीन पुलाजवळ सापळा लावला, तेथे सागर पवार हा संशयकरीत्या फिरताना आढळला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दागिने व मोबाईल मिळाले. याबाबत कसून चौकशी करत असताना, या वस्तू मनेराजुरी येथील घर फोडून चोरी केल्याचे पवार यांने सांगितले. तेव्हा गुन्हा अन्वेषण पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सिकंदर वर्धन, व स्टाफ यांनी केली.