सांगली समाचार - दि. २१|०२|२०२४
कानपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरु आहे. ही यात्रा कानपूरमध्ये पोहोचण्यापूर्वी एक वादग्रस्त पोस्टर झळकले आहे. त्यामध्ये राहुल गांधींना कृष्णाच्या अवतारात दाखवण्यात आल्याने नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत जोडो न्याय यात्रा कानपूरला पोहोचण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'भगवान कृष्ण' आणि यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना 'अर्जुन' दाखवणारे पोस्टर लावले आहेत.
उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य संदीप शुक्ला हे नाव आणि फोटो पोस्टवर झळकत आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा कानपूरमध्ये दाखल होत आहे. त्यापूर्वीच हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. 'एएनआय'ने याबद्दल ट्वीट केलं आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने काँग्रेसला सतरा जागा देण्याची तयारी दर्शविली असून काँग्रेसने हा प्रस्ताव स्वीकारला तरच पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता याबाबत विरोधक काय भूमिका घेणार आणि पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.