yuva MAharashtra तुम्हाला ठाऊक आहे का ? ATM कार्ड मोफत इन्शुरन्सचा लाभ सुद्धा देते !

तुम्हाला ठाऊक आहे का ? ATM कार्ड मोफत इन्शुरन्सचा लाभ सुद्धा देते !




सांगली समाचार |०५|०२|२०२४

आज-काल UPI अर्थात डिजिटल व्यवहाराला, म्हणजेच फोन पे गुगल पे इत्यादी मार्गाने अधिकाधिक आर्थिक व्यवहार होऊ लागलेले आहेत. परंतु या मार्गाचा अवलंब करण्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या बँकेचे डेबिट अर्थात एटीएम कार्ड घ्यावे लागते.

परंतु बहुतेक नागरिक हे एटीएम कार्डचा वापर केवळ एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म घेण्यासाठी फार फार तर खरेदीसाठी वापरतात. पण याच एटीएम कार्डवर तुम्हाला मोफत विमा संरक्षण मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? काही बँकांचे डेबिट कार्ड हे काही केसेसमध्ये 3 कोटी रुपयांपर्यंतचा मोफत अपघात विमा संरक्षण उपलब्ध करुन देतात. जाणून घेऊयात ATM कार्डद्वारे विम्याचे फायदे नेमके कसे मिळवायचे...

अनेक बँकांच्या डेबिट कार्डवर मोफत अपघात विमान संरक्षण आहे. हे विमा संरक्षण अगदी मोफत आहे. त्यासाठी डेबिट कार्ड धारकाकडून कोणताही प्रीमियम आकारला जात नाही. तसेच बँकेकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात नाहीत. ही एक ग्रुप पॉलिसी असते आणि त्यामुळे डेबिट कार्ड धारकाकडे त्याचा पॉलिसी नंबर नसतो.

डेबिट कार्ड विमा मिळवण्यासाठी काय करावे?

काही ठराविक डेबिट कार्डवर मोफत अपघात विमा संरक्षण मिळतो. त्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. या अटी आणि शर्तींपैकी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डेबिट कार्डधारकाला ठराविक कालावधीत डेबिट कार्ड वापरून व्यवहार करावे लागतात.

एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार, HDFC बँकेच्या मिलेनिया डेबिट कार्डवर देशांतर्गत हवाई / रेल्वे / रस्ते प्रवासासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा संरक्षण मिळते. या विम्याचा लाभ घेण्यासाठी डेबिट कार्डधारकाला 30 दिवसांत किमान एक व्यवहार करावा लागतो.

तर कोटक महिंद्रा बँकेच्या बाबत बोलायचं झालं तर फ्री इन्शुरन्स कव्हर मिळवण्यासाठी पात्र व्हायचं असेल तर कोटक महिंद्रा बँक क्लासिक डेबिट कार्डधारकाला गेल्या 30 दिवसांत किमान 500 रुपयांचे किमान दोन व्यवहार करणे आवश्यक आहे.

कोणते व्यवहार ठरतील पात्र?

वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम असतात. उदाहरणार्थ, Consumer Banking Group चे एमडी आणि प्रमुख प्रशांत जोशी यांच्या मते, जर तुमच्याकडे DBS Bank चे इन्फिनिटी डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला विम्याचा लाभ घेण्यासाठी पॉईंट ऑफ सेल (POS) किंवा ई-कॉमर्स ऑनलाईन व्यवहार करावे लागतील. UPI माध्यमातून करण्यात आलेले व्यवहार मान्य केले जाणार नाहीत