सांगली समाचार - दि. २६|०२|२०२४
माणसाला जसा या पृथ्वीवर जन्म मिळाला आहे तसा त्याचा मृत्यू सुद्धा अटळ आहे. परंतु कधी कोणाला मरण येईल हे सांगणं शक्य नाही. तरुण वयातही मरण पावलेले लोक आपण बघितली असतील आणि वयोवृद्ध झाल्यानंतर सुद्धा ,मृत्यू येणारी माणसे आपण बघितली असतील. परंतु अमुक व्यक्ती अमुक दिवशी मरेल असं कोणीही सांगू शकत नाही. परंतु आता आर्टिफिशल इंटेलेजेस म्हणजेच AI माणसाच्या मृत्यूची तारीख आणि वेळ सांगू शकतय. ऐकायला आणि वाचायला हे भीतीदायक आणि आश्चर्यकारक वाटत असलं तरी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
डेन्मार्कमधील ‘टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्क’ ने AI वर आधारित मृत्यूची भविष्यवाणी सांगणारे AI डेथ कॅल्क्युलेटर तयार केले आहे. हे एआय सिस्टममध्ये डेटा इनपुटचे तपशील देऊन रिजल्ट तयार करते. एखादा माणूस किती वर्ष जीवन जगणार आणि त्याचा मृत्यू कधी होणार हे सुद्धा यामाध्यमातून अचूकपणे समजते असा दावा संशोधकांनी केला आहे.
life2vec नावाचा अल्गोरिदम वापरून डॅनिश लोकसंख्येच्या डेटा वापर करून या सिस्टीमचे चेकिंग करण्यात आले. यासाठी 2008 ते 2020 पर्यंत 60 लाख लोकांच्या आरोग्य संबंधित माहितीचे विश्लेषण करण्यात आलं. यानंतर या सर्व लोकांच्या मृत्यूची अचूक वेळ समोर आली. 1 जानेवारी 2016 नंतर कोण जगणार हे या सिस्टीमने ओळखले. आणि या नव्या तंत्रज्ञानाने उपस्थित लोक चांगलीच प्रभावित झाली. जवळपास 78 टक्के अचूक डेटा या सिस्टीमच्या माध्यमातून समोर आला . सध्या ,आम्ही फक्त आठ वर्षांच्या कालावधीतील डेटा पाहू शकतो असे यावेळी डेन्मार्क आणि अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे.